आर्यन खान प्रकरणाचे अन्‍वेषण करणारे अधिकारी विश्‍व सिंह सेवेतून बडतर्फ !

वर्षभराच्‍या निलंबनानंतर कारवाई !

विश्‍व विजय सिंह

मुंबई – ‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरो’ने (एन्.सी.बी) पोलीस अधीक्षक विश्‍व विजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्‍यात आले आहे. विश्‍व सिंह हे ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अटक करणार्‍या आणि कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकणार्‍या पथकातील भाग होते; पण ज्‍या प्रकरणामुळे त्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्‍यात आले आहे, त्‍या प्रकरणाचा आर्यन खान याच्‍या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. ‘एन्.सी.बी.’चे महासंचालक सत्‍य नारायण प्रधान यांनी विश्‍व विजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्‍यात आल्‍याच्‍या वृत्ताला दुजोरा दिला आहे.