सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील समविचारी हिंदूंंनी एकत्र येऊन साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात साकडे घातले. या प्रसंगी उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, सौ. मनीषा बीडकर, उद्योजक श्री. आनंद पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, श्री. कैलास जाधव, ‘मराठा तितुका मेळवावा’चे अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर, ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. हरि विष्णु कुंभार, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, सौ. मेघा जोशी, सौ. सुरेखा काकडे यांसह अन्य उपस्थित होते.
या अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूरमधील हुपरी, मलकापूर, शाहूवाडी, गडहिंग्लज, निगवे, भुयेवाडी, यांसह अन्य गावांमध्येही ५० हून अधिक देवालयांमध्ये साकडे घालण्यात आले.
जन्मोत्सवाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांतील ३३ हून अधिक मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील ३३ हून अधिक मंदिरांमध्ये साकडे !
सांगली – सांगली जिल्ह्यात ३३ हून अधिक मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले. यात प्रामुख्याने मिरज येथील संत वेणास्वामी मठ, काशी विश्वेश्वर देवालय, श्री अंबाबाई मंदिर, सांगलीतील गावभागातील श्री मारुति मंदिर, हरिपूर येथील बागेतील गणपति, तुंग येथील श्री मारुति मंदिर, ईश्वरपूर येथील श्री यमाई मंदिर, भवानीमाता मंदिर, विटा येथील भैरवनाथ मंदिर, पलूस येथील पद्मावती मंदिर यांसह अन्य मंदिरांचा समावेश आहे. जन्मोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध भागांतील मंदिरांची स्वच्छताही करण्यात येत आहे, तसेच ‘समाजाने साधना करावी आणि देवतांचे आशीर्वाद मिळावे’, यांसाठी ठिकठिकाणी प्रवचने घेण्यात येत आहेत.