वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर !

( संग्रहीत छायाचित्र )

पुणे – मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक पुणेकर वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. त्यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. येत्या काही दिवसांत पुण्यात वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरांतील वाहतूक कोंडीचा ‘सर्व्हे’ करून ‘टॉम टॉम’ या खासगी संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

वाहतूक कोंडीच्या सूचित ब्रिटनची राजधानी लंडन पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारतातील बेंगळुरू या सूचित दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशाची राजधानी देहली ३४ व्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार भारतातील ३ शहरांत सर्वाधिक वाहतूक असल्याचे समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

ही विदारक स्थिती दूर करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार आहे ?