‘जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती ।’, या उक्तीचा प्रत्यय देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीमती वसुधा देशपांडे

‘२९.५.२०१६ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी नाडीपट्टीवाचनातून सांगितले, ‘परात्पर डॉ. आठवले हे विष्णूचे अवतार आहेत.’ आता ‘हे मान्य करणे किंवा न करणे’, हा प्रश्नच राहिला नाही. याचा अनुभव मला मी सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वीच आला; पण तेव्हा मला इतरांनी भ्रमात काढले. आता गतआयुष्य आठवले, म्हणजे ‘तो भ्रम नव्हता. ते एक सत्य होते’, हे माझ्या लक्षात आले.

१. वर्ष १९७६ मध्ये साधिका रुग्णालयात असतांना सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिच्यावर लक्ष ठेवणे

मी जुलै १९७६ मध्ये ३ मास रुग्णालयात होते. त्याही वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले होते. ते दिवसभर माझ्यावर लक्ष ठेवायचे. त्यांची भेट झाल्यावर मला आनंद व्हायचा. त्यांना घरची माहिती विचारल्यास टाळाटाळ करून ते दुसर्‍या विषयावर बोलायचे. त्या वेळी इतर रुग्णाईतांना ते दिसत नव्हते. मला अशा संभाषणाची सवय झाली होती. तेव्हा ते केवळ मलाच दिसत होते.

२. वर्ष १९९५ मध्ये पोटावर शस्त्रक्रिया करण्याच्या वेळी रुग्णालयात रात्री सर्व झोपलेले असतांना पांढरा शर्ट आणि पांढरा पायजमा या वेशातील सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आसंदीत बसून साधिकेवर लक्ष ठेवणे

वर्ष १९९५ मध्ये मी रुग्णाईत होते. माझ्या पोटावर ५ वेळा शस्त्रकर्म झाले. माझ्यावर चौथ्यांदा शस्त्रक्रिया करण्याच्या आधी मला ताप येत होता. तो काही केल्या उतरत नव्हता. जेव्हा आधुनिक वैद्यांना निदान होईना, तेव्हा मी मनात अंबाबाईचा धावा चालू केला. रात्री ३ नंतर सर्व झोपलेले असायचे. तेव्हा ‘एक गोरीपान व्यक्ती पांढरा पायजमा आणि पांढरा शर्ट घालून पांढर्‍या आसंदीत बसून माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवायचे. मला झोप यायची नाही. आमचे काहीच संभाषण व्हायचे नाही. ती व्यक्ती अनुमाने पहाटे ५ वाजेपर्यंत बसायची. माझा समज होता, ‘या व्यक्तीला कुणी निरीक्षणाला ठेवले असेल.’ मी माझ्या यजमानांना (परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका यांना) हे सर्व सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हा तुझा भ्रम आहे. येथे रात्री १२ वाजल्यानंतर कुणी येत नाही. आम्ही येथेच असतो; पण आम्हाला कधीच ती व्यक्ती दिसत नाही.’’ आता वर्ष २०१६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘आपण ज्यांना आसंदीत बघितले, ते हेच होते.’

३. डोळ्यांनी दिसत नसतांनाही सनातनचे प्रवचन ठरवायला जाणे आणि त्या वेळी सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉक्टरांनी बस अन् झाड यांवर आदळण्यापासून वाचवणे

वर्ष २००० मध्ये मला डोळ्यांनी काहीच दिसत नव्हते. त्या वेळी सनातनचे प्रवचन ठरवायला जवळच्या तालुक्याच्या गावी जात असतांना मला कधी यजमानांचा (परात्पर गुरु देशपांडेकाका यांचा) हात दिसायचा, तर कधी त्यांचा पांढरा शर्ट दिसायचा. मी त्या दिशेने चालायचे. एकदा मी बसवर आदळणार होते. समोर उभी असलेली बस मला दिसत नव्हती. तेव्हा आपणच माझा हात धरून यजमानांच्या मागे आणून सोडले. त्यानंतर काही वेळाने मी एका झाडापाशी गेले. त्याही वेळी आपण हात धरून मला यजमानांच्या मागे आणून सोडले.

– श्रीमती वसुधा कालिदास देशपांडे (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक