सोनीपत (हरियाणा) येथे जमावाकडून मशिदीवर आक्रमण !

  • नमाजपठण करणार्‍यांना मारहाण

  • १० जण घायाळ

जमावाकडून मशिदीवर आक्रमण

सोनीपत (हरियाणा) – येथील सांदल कलां गावामध्ये ९ एप्रिलच्या रात्री जमावाने एका मशिदीवर आक्रमण केले. यात नमाजपठण करणार्‍यांना मारहाण करण्यात आली. त्यात १० जण घायाळ झाले. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. हे आक्रमण नमाजपठणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी ३० मार्च या दिवशी काही युवकांनी मशिदीमध्ये घुसून तेथे भगवा ध्वज फडकावला होता. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली होती.

पोलीस आयुक्त सतीश बालन यांनी सांगितले की, गावातील काही लोकांनी मशिदीमध्ये घुसून नमाजपठण करणार्‍यांना मारहाण केली. या प्रकरणी त्यांच्यात कोणतेही वैमनस्य नव्हते. पोलिसांनी १६ तरुणांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू आहे. भविष्यात विनाकारण धार्मिक स्थळात शिरून असा प्रकार केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.