मथुरा येथे अवैध शस्त्र कारखान्यावर धाड टाकून ३ जणांना अटक !

मथुरा (उत्तरप्रदेश) – देहली – आगरा राष्ट्रीय महामार्गजवळील जंगलामध्ये पोलिसांनी धाड टाकून शस्त्र बनवण्याच्या कारखाना उघडकीस आणला. या वेळी झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी ३ जणांना अटक केली. यात अक्रम याला गोळी लागल्याने तो घायाळ झाला. येथून १२ हून अधिक पिस्तुले आणि अन्य साठा जप्त करण्यात आला आहे.