देहली दंगलीच्या प्रकरणात आणखी तिघांना अटक

हापूड (उत्तरप्रदेश) – वर्ष २०२० मध्ये राजधानी देहलीत धर्मांधांनी दंगल घडवून आणली होती. या दंगलीतील धर्मांधांना शस्त्रे पुरवण्याचे काम उत्तरप्रदेशातील मेरठ येथील एका टोळीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दंगलीत सहभागी झालेल्या धर्मांधांना शस्त्रे पुरवण्यासाठी व्हॉट्सॲप गट बवनण्यात आला होता. या प्रकरणी खिजर, जमशेद आणि नौखेज यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचा प्रमुख बाबू वासीम फरार आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांकडून अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. वासीम याला पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

मेरठमध्ये शस्त्रे पुरवणार्‍या टोळीची माहिती मिळाल्यावर काही पोलीस त्यांची ओळख लपवून या व्हॉट्सॲप गटातमध्ये सहभागी झाले. ‘आम्हाला शस्त्रे खरेदी करायची आहेत’, अशी मागणी या पोलिसांनी केली. शस्त्रांच्या खरेदीसाठी या टोळीतील लोकांनी पोलिसांना हापूड येथे बोलवले. त्या वेळी पोलिसांनी या तिघांना अटक केली.