पणजी येथे तिरंग्याचा अवमान

अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद


पणजी, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – तिरंग्याचा अवमान केल्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात ‘राष्ट्रीय प्रतिकाचा अवमान प्रतिबंधक कायदा १९७१’ अंतर्गत हा गुन्हा नोंद केला आहे. एका व्यक्तीला सकाळी चालतांना तिरंगा रस्त्यावर पडलेला आणि तो एका मृत उंदराला गुंडाळण्यासाठी वापरल्याचे आढळून आले होते. यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी तिरंग्याचा अवमान झाल्याविषयी चलचित्र प्रसारित केले. पणजी पोलिसांनी या घटनेवरून गुन्हा प्रविष्ट केला.

नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाची ठिकठिकाणी विक्री झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ ही राज्यव्यापी मोहीम राबवली होती. तिरंग्याचा अवमान रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधकात्मक उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती.