१. सौ. मंजिरी बेडेकर
अ. ‘मी पू. खेरआजी यांच्या अंत्यदर्शनास गेले. तेव्हा मला ‘पू. आजींची खोली पुष्कळ मोठी आणि प्रकाशमान झाली आहे’, असे जाणवत होते.
आ. मला ‘पू. आजी ध्यानावस्थेत आहेत’, असे वाटले.
इ. तेथे माझा नामजप चालू झाला आणि माझ्याकडून प्रार्थना होऊ लागल्या. मी साधनेला आरंभ केल्यापासून सौ. मीनल खेर यांच्याकडे जात आहे. तेव्हापासून पू. आजी मला आईचे प्रेम देत होत्या. त्या सर्वांशी प्रेमाने बोलायच्या.
ई. पू. आजींना वाचनाची पुष्कळ आवड होती. त्यांना भावलेले (आवडलेले) विचार त्या लिहून ठेवायच्या आणि मी गेले की, मला सांगायच्या. कधी माझी प्रकृती ठीक नसायची. तेव्हाच पू. आजी माझी आठवण काढायच्या.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला साधनेेत ठेवले आणि पू. खेरआजी अन् साधक यांचा सत्संग मिळवून दिला. याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
२. श्री. हनुमंत करंबेळकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७२ वर्षे)
अ. ‘पू. खेरआजींकडे पहातांना ‘त्या शांत झोपल्या आहेत’, असे मला वाटत होते. त्यांच्याकडून ‘मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’
३. सौ. मधुरा मच्छिंद्र खेराडे
अ. ‘पू. आजींचा चेहरा पिवळसर दिसत होता.
आ. पू. आजींचे पाय पुष्कळ थंड झाले होते. मी त्यांच्या पायांना तेल लावले. नंतर २ घंटे माझ्या हाताला चंदनाचा सुगंध येत होता. तेव्हा मला आध्यात्मिक लाभ होऊन मला पुष्कळ हलके वाटत होते.’
४. सौ. वैभवी पाध्ये
अ. ‘मृत्यूनंतर पू. आजींचे डोळे पूर्ण मिटलेले नव्हते. ‘कोणत्याही क्षणी त्या डोळे उघडतील’, असे मला वाटत होते.
आ. त्यांचा चेहरा पिवळसर दिसत होता आणि चेहर्यावर पुष्कळ तेज होते. त्या वेळी वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवत होते.’
५. सौ. सुषमा सनगरे
अ. ‘पू. खेरआजींनी देहत्याग केल्याचे समजले. तेव्हा ‘त्या माझ्याशी नेहमी आनंदाने बोलायच्या आणि हसायच्या’, हे आठवून माझ्या मनाला आनंद होत होता.
आ. त्यांचे अंत्यदर्शन घेतांना ‘पू. आजींकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे’, अशी माझी प्रार्थना झाली.
इ. संध्याकाळी माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू झाला आणि त्या वेळी घरात कुठेही उदबत्ती लावलेली नसतांना मला उदबत्तीचा सुगंध आला. तेव्हा ‘सूक्ष्मातून भगवंताचे तत्त्व कार्यरत असते’, याची मला अनुभूती आली.’
६. सौ. रचना राऊत
अ. ‘पू. खेरआजींना बघायला परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून आले असतील’, असे माझ्या मनात आले.
आ. ‘पू. आजींचा श्वासोच्छ्वास होत आहे आणि त्या झोपल्या आहेत’, असे मला जाणवले.
इ. पू. खेरआजींच्या कपाळावर उमललेल्या कमळासारखा आकार दिसत होता.’
७. श्री. गोविंद भारद्वाज
‘पू. खेरआजींचा चेहरा तेजस्वी आणि प्रसन्न वाटत होता. त्यांना ठेवलेल्या कक्षात सर्वत्र चैतन्य जाणवत होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ३.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |