माध्यान्ह भोजनात मुसलमान विद्यार्थ्यांना झटका पद्धतीचा मांसाहार दिल्याने पालकांचा विरोध !

बंगालमधील एका सरकारी शाळेतील प्रकार !

प्रातिनिधिक छायाचित्र

पूर्व मेदिनीपूर (बंगाल) – येथील एका सरकारी शाळेमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाच्या वेळी झटका पद्धतीचा मांसहार खाऊ खातल्याने त्यांच्या पालकांनी येथे ७ जानेवारी या दिवशी निदर्शने केली. त्यांचे म्हणणे होते, ‘झटका मांस खाऊ घातल्याने आमच्या मुलांना अपवित्र करण्याचा प्रयत्न झाला. मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या.’ तसेच त्यांनी मुख्याध्यापकांच्या त्यागपत्राची मागणी केली. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

(म्हणे) ‘झटका मांस देणे संघाच्या धोरणाचा भाग !’ – पालकांचा आरोप  

मुसलमान विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोप केला की, मुसलमान विद्यार्थ्यांना माध्यन्ह भोजनामध्ये झटका मांस खाऊ घालून त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे, हा रा.स्व. संघाच्या धोरणाचाच एक भाग आहे. (‘हिंदूंना हलाल मांस, हलाल उत्पादने खाऊ घालणे हा कुणाच्या धोरणाचा भाग आहे ?’, हे मुसलमान पालक सांगतील का ? – संपादक)

सरकारच्या आदेशात झटका कि हलाल यांचा उल्लेख नाही !

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने माध्यान्ह भोजनासाठी भात, वरण, सोयाबीन, अंडे, कोंबडीचे मांस, ऋतू प्रमाणे असणारी फळे देण्याची तरतूद केली आहे. यात कोंबडी मांस कशा प्रकारचे म्हणजे हलाल कि झटका, हे सांगितलेले नाही. (आता या घटनेमुळे लगेचच मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेस या आदेशात पालट करून मुसलमानांना हलाल पद्धतीने मांसाहार देण्याची तरतूद करतील, यात शंका नाही ! – संपादक)

‘हलाल’ आणि ‘झटका’ मांस म्हणजे काय ?

हलाल पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याचे तोंड मक्केच्या दिशने करून त्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि प्राण्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात  रक्त वहाते आणि नंतर त्या प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो. हिंदु, शीख आदी भारतीय धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्याची हत्या केली जाते. यामध्ये प्राण्याची मान एकाच घावामध्ये कापली जाते. यामुळे प्राण्याला अल्प प्रमाणात त्रास होतो.

संपादकीय भूमिका

  • गेली काही वर्षे हिंदूंना हलाल मांस विकण्यात येत आहे, त्याविषयी हिंदू अज्ञानी आहेत; मात्र झटका मांस खाऊ घालण्यात आल्यावर लगेच त्याचा विरोध करणारे  मुसलमान किती जागरूक आहेत, हे हिंदू लक्षात घेतील का ?
  • सर्वत्र हलाल मांस विकले जात असल्यामुळे आता हिंदूंना ‘झटका’ मांस विकत मिळावे, यासाठी आंदोलन करावे लागत आहे. ही परिस्थिती निर्माण करणार्‍या मुसलमान संघटनांविषयी हिंदू कधी आवाज उठवणार ?