राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन संमत !

जितेंद्र आव्हाड

ठाणे – विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा खेळ बंद पाडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते यांना जामीन संमत करण्यात आला. १२ नोव्हेंबरला या सर्वांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावरया सर्वांना जामीन संमत करण्यात आला.