राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या स्थानांतराचे गृहविभागाचे आदेश, पुण्यातील ६ उपायुक्तांचा समावेश !

पुणे – राज्यातील पोलीस उपायुक्त, अतिरिक्त अधीक्षक तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या १०४ पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्याचे आदेश गृहविभागाने ७ नोव्हेंबर या दिवशी दिले आहेत.

पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, पौर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे, सागर पाटील यांचे स्थानांतर करण्यात आले आहे, तसेच पुणे शहरात १६ पोलीस अधिकारी पालटून आले असून ‘लाचलुचपत’च्या अधीक्षकपदी अमोल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.