प्लास्टिकचा वापर करणार्‍या दुकानदारांकडून २ लाख रुपयांचा दंड !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची कारवाई !

ठाणे, २२ सप्टेंबर (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्लास्टिकच्या बंदीविषयी बर्‍याच मोहिमा आणि उपक्रम राबवले, तरी व्यापारी, फेरीवाले, फळ आणि फूल विक्रेते हे प्लास्टिकचा वापर करतच आहेत. पालिकेच्या घनकचरा विभागाने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणार्‍या दुकानमालकांवर दंडात्मक कारवाई चालू केली आहे. यात गेल्या २ दिवसांत २ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.