हिंदु तरुणाशी विवाह करण्याचा हट्ट धरणार्‍या मुसलमान तरुणीची तिच्या वडिलांनी केली हत्या !  

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे हिंदु तरुणाशी विवाह करण्याचा हट्ट धरणार्‍या स्वतःच्या मुलीच्या तिच्या वडिलांनी ठार करून पोलीस ठाण्यात शरण गेल्याची घटना समोर आली आहे. मुवीस अहमद असे वडिलांचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. नगला कसाब गावात १५ सप्टेंबरला ही घटना घडली.

मुसलमान तरुणीने तिच्या कुटुंबियांना तिच्या प्रेमाविषयी सांगितल्यावर त्यांनी विरोध केला होता. तिने त्यांना समाजवण्याचाही प्रयत्न केला; मात्र ‘ते ऐकत नाहीत’, हे पाहून ती २ मासांपूर्वी घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केल्यावर त्यांनी तिला कह्यात घेऊन कुटुंबियांकडे सोपवले होते. कुटुंबियांनी मुलीला घरातून बाहेर पाडण्यास बंदी घातली होती. एकेदिवशी तिने हिंदु प्रियकराशी विवाह करण्याविषयी सांगितल्यावर वडील मुवीह अहमद याने पिस्तूलातून गोळी झाडून तिला ठार केले आणि तो पसार झाला. दुसर्‍या दिवशी त्याने पोलीस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली.

संपादकीय भूमिका

हिंदु तरुणाशी विवाह करण्यावरून स्वतःच्या मुलीला ठार करणारे कधीतरी हिंदूंशी प्रेमाने वागू शकतील का ? हिंदूंना नेहमी धर्मनिरपेक्षतेचे आणि सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे याविषयी कधी बोलणार ?