वेदांता ग्रुपचा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा ! – अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – तळेगाव येथे होणारा ‘वेदांता ग्रुप’ सेमी कंडक्टर आणि ‘डिस्प्ले फेब्रिकेशन’चा प्रकल्प राज्य सरकारने हस्तक्षेप करून तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४ सप्टेंबर या दिवशी पत्राद्वारे केली आहे.

अजित पवार यांनी या पत्रात म्हटले आहे की, या प्रकल्पाासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्यादृष्टीने सर्व पूर्तता करण्यात आली होती. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा.