गोव्याच्या पोलीस खात्याविषयी विश्वासार्हता अल्प : अन्वेषण अधिकार्‍यांना देणार विशेष प्रशिक्षण

गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह

पणजी, ३० जुलै (वार्ता.) – गोव्यात पोलीस खात्याविषयी विश्वासार्हतेचा दर अल्प असल्याने अन्वेषण अधिकार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्याविषयी पोलीस प्रशिक्षण केंद्र एक ‘मोड्युल’ (उपक्रम) विकसित करत आहे, अशी माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिली. ‘अन्याय रहित जिंदगी’ ही अशासकीय संघटना आणि पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानवी तस्करीविरोधी जागतिक दिना’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले , ‘‘अन्वेषण अधिकार्‍यांना विशेष प्रशिक्षण दिल्याने गुन्हेगारीसंबंधी प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अल्प होऊन विश्वासार्हता वाढेल. कायदा मोडून आरोपी निर्दोष सुटण्याविषयीची कारणे जाणून घेण्यासाठी पोलीस खात्याने सरकारी अधिवक्त्यांची एक बैठकही घेतली आहे.’’ या कार्यक्रमात अन्याय रहित जिंदगी संघटनेचे संचालक अरुण पांडे म्हणाले, ‘‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो २०२२ च्या आकडेवारीनुसार गोव्यात महिलांची तस्करी होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलिसांविषयीच्या विश्वासार्हतेचे प्रमाण शून्य आहे.’’

संपादकीय 

ही स्थिती गोवा पोलिसांना लज्जास्पद !