पुणे येथे विद्यार्थ्यांना मद्य पिण्यास उद्युक्त करणारा फलक लावणार्‍या हॉटेल मालकावर कारवाई !

लोणी काळभोर (पुणे) येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी उद्युक्त करणारा विज्ञापनाचा फ्लेक्स

लोणी काळभोर (पुणे) – महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी उद्युक्त करणारा विज्ञापनाचा फ्लेक्स लावल्याच्या प्रकरणी देवीप्रसाद शेट्टी या हॉटेल मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रदीप क्षीरसागर यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कदमवाकवस्ती येथील एम्.आय.टी. युनिव्हर्सिटी चौकात ‘द टिप्सी’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या मालकाने एक विज्ञापनाचा फ्लेक्स लावला होता. त्यावर ‘केवळ एम्.आय.टी.च्या विद्यार्थ्यांसाठी, तळीलँडमध्ये स्वागत, २१ जुलैला ७९९ रुपयांमध्ये २ घंट्यांत अमर्यादित प्या’, असे लिखाण इंग्रजीतून दिले होते. या फलकामुळे शेट्टी यांच्यावर कारवाई करण्यात आली.