फणसगावातील २ मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

देवगड – तालुक्यातील फणसगाव येथील श्री रवळनाथ मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर या २ मंदिरांतील दानपेट्या फोडून त्यातील रक्कम चोरल्याची घटना २२ जुलै या दिवशी रात्री घडली. या दोन्ही दानपेट्या मंदिरांच्या जवळच टाकलेल्या आढळल्या. २३ जुलै या दिवशी सकाळी मंदिराचे पुजारी प्रवीण गुरव आणि चंद्रकांत आडिवडेकर हे पूजा करण्यासाठी मंदिरात गेल्यावर चोरीची घटना उघड झाली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला अन् त्यानंतर अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.