पुणे – मुसळधार पावसामुळे विजेचा प्रवाह खंडित होत असल्याने दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरणकडून पुणे परिमंडळातील अनुमाने ४ सहस्र २७५ कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने दुरुस्त करावा, दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्यास पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी शाखा अभियंत्यांना दिल्या. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था नसल्यास दोष आढळलेल्या ठिकाणी खोदकाम करून, केबलमधील आर्द्रता काढून, जोड देऊन कामे करावी लागत आहेत, तसेच काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाण्याचा उपसा करून ही कामे केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.