स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी पुढील प्रसारसाहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.

१. ‘भारतात सुराज्य निर्माण करूया !’ आणि ‘क्रांतीकारकांचा मूलमंत्र – वन्दे मातरम् ।’ ही दोन ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रके. (‘क्रांतीकारकांचा मूलमंत्र – वन्दे मातरम्’ हे पत्रक छापायचे कि नाही, हे उत्तरदायी कार्यकर्ते जिल्ह्यातील आवश्यकतेनुसार ठरवू शकतात.)

२. ‘ए २’ आकारातील भित्तीपत्रक

३. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी १० फूट x ८ फूट आकारातील होर्डींग (कलाकृती सोबत दिली आहे)

४. २.२५ फूट x ३ फूट या आकारातील २ फलक

अ. राष्ट्रध्वजाची विटंबना ही राष्ट्रहानी !

आ. राष्ट्रध्वज अन् राष्ट्रगीत यांचा मान राखा !

५. २.२५ फूट x ३.५ फूट या आकारातील २ फलक

अ. राष्ट्राभिमानी बनण्यासाठी हे करा !

आ. राष्ट्राभिमान जोपासा, राष्ट्ररक्षण करा !

६. ६ फूट x २.५ फूट या आकारातील ‘वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताचा भावार्थ आणि संपूर्ण वन्दे मातरम्’चे २ फलक

या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये, रहिवासी संकुल आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.