हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या

प्रसिद्ध ज्योतिषाचार्य चंद्रशेखर गुरुजी

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – राज्यातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर चाकूद्वारे ७० हून अधिक वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये घडली. चंद्रशेखर यांच्या हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. आक्रमणकर्त्यांनी आधी ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर आक्रमण केले. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चंद्रशेखर गुरुजी मूळचे बागलकोटचे होते आणि काही कौटुंबिक कामाच्या निमित्ताने हुब्बळ्ळी येथे आले होते.

(सौजन्य : Republic World) 

संपादकीय भूमिका

दिवसाढवळ्या अशा प्रकारची हत्या होण्याची घटना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍न निर्माण करणारी आहे !