सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांकडून हिंदु महिला आणि तरुणी यांची हत्या

विवाहबाह्य संबंधांना होणाऱ्या विरोधातून हत्या

सुलतानपूर (उत्तरप्रदेश) – येथे २८ जून या दिवशी रामसुख नावाच्या व्यक्तीची पत्नी आणि २१ वर्षांची मुलगी यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी इरफान, सदान आणि शाहबाज यांना अटक केली. इरफान याला अटक करतांना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यात एक पोलीस शिपाई घायाळ झाला. या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात इरफान याच्या पायाला गोळी लागल्याने तो घायाळ झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार इरफान याचे रामसुख याच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध होते. त्यांना त्यांची मुलगी विरोध करत होती. यातूनच ती घरात एकटी असतांना या तिघांनी तिची हत्या केली. त्या वेळी रामसुख यांची पत्नी तेथे आल्यावर या आरोपींनी तिचीही हत्या केली.