पू. निर्मला दातेआजींचे नव्वदाव्या वर्षात पदार्पण ।

२५.५.२०२२ या दिवशी, म्हणजे वैशाख कृष्ण दशमीला सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) निर्मला दाते यांचा ८९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची सून सौ. ज्योती दाते यांनी केलेले काव्यपुष्प येथे दिले आहे.

पू. (श्रीमती) निर्मला दाते

८९ व्या वाढदिवसानिमित्त पू. (श्रीमती) निर्मला दाते यांच्या चरणी सनातन परिवाराकडून शिरसाष्टांग नमस्कार !

सौ. ज्योती दाते

पू. दातेआजींचे नव्वदाव्या वर्षात पदार्पण ।
त्यागाची मूर्ती असे त्यांचे जीवन ।
करूनी भगवंत चरणी सर्व समर्पण ।
चुकवले जन्म मरण ।। १ ।।

तरुणासही लाजवेल, अशा त्या अखंड उत्साही ।
सान थोर सर्वांशीच जवळीक साधती ।
सातत्य आणि चिकाटी ज्यांचा असे स्थायीभाव ।
प.पू. डॉक्टरच (टीप १) सर्व करतात, अशी त्यांची दृढ श्रद्धा असे ।। २ ।।

पू. दातेआजी म्हणजे मूर्तीमंत प्रीती ।
इतरांचाच विचार त्या अखंड करती ।
कोणतीही कृती करण्यास सदैव तत्पर असती ।
गुरुदेवांचे (टीप २) सत्वर आज्ञापालन त्या करती ।। ३ ।।

त्यांच्या जन्मदिनी करिते त्यांना नमन ।
त्यांच्या गुणांचे करता येऊ दे मनन ।
पू. आजींकडून सदैव शिकता येऊ दे ।
गुरुदेवा, हीच प्रार्थना आपल्या चरणी असे ।। ४ ।।

टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले

टीप २ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे

– सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (पू. (श्रीमती) निर्मला दाते यांची सून), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.५.२०२२)