भाजपचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा नोंद !

मालवणी येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत मशिदीच्या समोरून जातांना ध्वनीक्षेपक लावल्याचे प्रकरण

  • हीच तत्परता पोलिसांनी धर्मांधांच्या संदर्भातही दाखवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! मानखुर्द येथे धर्मांधांनी दंगल करूनही पोलीस स्वतःहून गुन्हा नोंद करण्यास सिद्ध नव्हते ! – संपादक 
  • मशिदीच्या समोरून जातांना हिंदूंनी ध्वनीक्षेपक लावायचा नाही, असे पोलिसांना वाटते, तर न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे धैर्य त्यांच्यात का नाही ? – संपादक 

मुंबई – मालवणी येथे रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळी मशिदीच्या समोरून जात असतांना ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाचे नेते तेजिंदरसिंह तिवाना आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्यासह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ‘या मिरवणुकीची अनुमती घेण्यात आली नव्हती’, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘मशिदीसमोर हिंदूंनी गोंधळ घातला’, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. (हिंदूंनी मिरवणुकीची अनुमती घेतली नसेल, तरी ती घ्यायला हवी होती; पण ‘धर्मांधांनी केलेल्या अशा किती अवैध घटनांमध्ये पोलीस तत्परतेने त्यांच्यावर कारवाई करतात ?’, हेही त्यांनी सांगायला हवे ! – संपादक)