१. कपड्यांवर त्रासदायक (काळे) आवरण आले असल्यास किंवा कपड्यांमध्ये त्रासदायक काळी शक्ती कार्यरत झाली असल्यास ओळखण्याची पद्धत
१ अ. कपड्यांकडे पाहून ‘ते घालू नयेत’ असा विचार येणे किंवा त्यांच्याकडे पाहिल्यावर डोळ्यांची आग होणे, डोके जड होणे, मळमळणे इत्यादी त्रास होऊ शकतात.
१ आ. कपडे हातात घेतल्यावर हात जड होणे, हात दुखणे किंवा कपड्यांचा स्पर्श नकोसा वाटणे असे त्रास होतात.
१ इ. कपड्यांना दुर्गंध येणे, कपड्यांची घडी केल्यावर त्यांच्या कडा अस्पष्ट दिसणे
२. कपड्यांमधील त्रासदायक शक्ती नष्ट करण्यासाठी करायचे उपाय
२ अ. कपडे खडे मीठ घातलेल्या पाण्यात किमान अर्धा ते १ घंटा भिजत ठेवावेत आणि त्यानंतर ते धुवून वाळवावेत.
२ आ. कपड्यांमधील त्रासदायक आवरण न्यून न झाल्यास सनातनचे सात्त्विक उत्पादन ‘सनातन गोमूत्र अर्क’ अर्धा बालदीत २ – ३ चहाचे चमचे या प्रमाणात घालून त्या पाण्यामध्ये कपडे किमान अर्धा ते १ घंटा भिजत ठेवावेत आणि त्यानंतर ते धुवून उन्हात वाळवावेत.
३. कपड्यांमधील त्रासदायक शक्ती वाढू नये आणि ते भारित करण्यासाठी कपड्यांवर नियमितपणे करावयाचे उपाय
३ अ. कपड्यांमध्ये देवतांच्या नामपट्ट्या किंवा सनातन-निर्मित कापूर घालून ठेवावा.
३ आ. कपडे १५ ते २० मिनिटे उन्हामध्ये ठेवावेत.
अशा प्रकारे उपाय केल्यामुळे कपड्यांमधील त्रासदायक काळी शक्ती नष्ट होऊन त्यामध्ये सकारात्मक शक्ती कार्यरत होण्यास साहाय्य होते.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२२)
|