(म्हणे) ‘पुढच्या वर्षी हिंडता-फिरता अध्यक्ष नेमायला हवा !’ – प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांची अप्रसन्नता

अध्यक्ष निवडीच्या वेळीच या गोष्टी लक्षात येऊ शकल्या नसत्या का ? आता व्यासपिठावरून अशी विधाने सवंग लोकप्रियतेसाठी केली जात आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? – संपादक

प्रा. कौतिकराव ठाले-पाटील

नाशिक, ३ डिसेंबर (वार्ता.) – मागील वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती ठीक नसतांनाही ‘आपल्यासाठी अनेक लोक येणार, पैसे व्यय झाले आहेत’, हे समजून संमेलनाला उपस्थित राहिले. डॉ. जयंत नारळीकर यांना मी दोष देत नाही; मात्र त्यांना थोडा वेळ संमेलनाला उपस्थित रहाता आले असते. पुन्हा अशी वेळ येऊ नये, यासाठी पुढच्या वर्षी हिंडता-फिरता अध्यक्ष नेमायला हवा, अशा शब्दांत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी अप्रसन्नता व्यक्त केली.

या वेळी प्रा. कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, ‘‘काहींनी आपल्या स्वार्थासाठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षनिवडीविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. आमच्या मनात अध्यक्ष निवडतांना जात-पात असे विचार नव्हते. नाशिकचे संमेलन जितके वेठीला धरण्यात आले, त्या इतके कोणतेही संमेलन वेठीला धरण्यात आले नाही, हे मला खेदाने म्हणावे लागेल. काही साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करतात; मात्र सर्वांची पुस्तके चांगलीच असतात असे नाही.’’