महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी महापालिका विभागांना अचानक भेटी देऊन कामाच्या वेळेत अनुपस्थित कर्मचार्‍यांना दिल्या नोटिसा !

महापालिका उपायुक्त राहुल रोकडे (उजवीकडे) विविध विभागांना अचानक भेटी देऊन पहाणी करतांना

सांगली, २७ सप्टेंबर (वार्ता.) – सांगली महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी महापालिकेच्या विविध विभागांना अचानक भेटी देत कामाच्या वेळेत अनुपस्थित कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली. कामाच्या वेळेत अनुपस्थित असणार्‍या तिघा कर्मचार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या. यापुढे कोरोना, महापूर पंचनामे, तसेच अन्य कोणत्याही कारणाखाली कर्मचारी अनुपस्थित दिसल्यास त्या कर्मचार्‍यावर कारवाई करण्याची चेतावणी उपायुक्तांनी दिली.

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मुख्यालय, तसेच शेजारील इमारतीमध्ये असणार्‍या विविध कार्यालयात दुपारनंतर कर्मचारी अनुपस्थित असल्याच्या सदस्य आणि नागरिक यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे दुपारनंतर महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी महापालिकेतील आस्थापना, आरोग्य, लेखापरीक्षण, तसेच अन्य विभागांना अचानक भेटी दिल्या. या वेळी आस्थापना अधिकारी अनिल चव्हाण, प्रमोद रजपूत उपस्थित होते.