युवा सेनेच्या वतीने ‘ई-पीक पहाणी’ मार्गदर्शन शिबिर !

पीक पहाणी शिबिरात मार्गदर्शन करतांना विविध मान्यवर आणि उपस्थित शेतकरी

पलूस (जिल्हा सांगली) – शिवसेना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोंदीलवाडी येथे शेतकर्‍यांना शासनाच्या ‘ई-पीक पहाणी’ विषयी योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी पलूस तहसीलदार निवास ढाणे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. प्रारंभी युवा सेना जिल्हाप्रमुख विनायक गोंदील यांनी प्रास्ताविक केले. युवा प्रगतशील शेतकरी जगदीश पाटील यांनी सातबारा विषयी असलेल्या अडचणी तहसीलदार यांच्यासमोर मांडल्या. यानंतर तहसीलदारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी तलाठी बाबुराव जाधव, किशोर पाटील, अण्णा माळी, चंद्रकांत गोंदील, रघुनाथ गोंदील, मोहन गोंदील, संजय गोंदील, शामराव गोंदील यांसह अन्य उपस्थित होते.