
देवगड – देवगड-जामसंडे शहरात लावण्यात येणार्या फलकांविषयी नगरपंचायतीने कडक भूमिका घेतली आहे. अनुमतीविना फलक लावण्यास मनाई करण्यात आली असून नेमून दिलेल्या कालावधीत फलक न हटवल्यास फलक कह्यात घेण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी दिली. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या क्षेत्रात अनुमतीविना काही फलक लावण्यात आले आहेत. अनुमतीविना फलक लावले जातात, तसेच अनुमती घेऊन लावलेले फलक ठरलेल्या कालवधीत संबंधितांकडून काढले जात नाहीत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे थांबवण्यासाठी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नियमावली करण्यात आल्याचे नगराध्यक्षा साळसकर यांनी सांगितले.
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !