सांगली येथे ८ जुलैपासून सर्व व्यावसायिक त्यांची आस्थापने चालू करत आहेत !

व्यापारी महासंघाचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन

सांगली, ७ जुलै (वार्ता.) – अत्यावश्यक सेवा वगळता इतर २० टक्के व्यवसाय ७० पेक्षा अधिक दिवस प्रशासनाने बंद ठेवले आहेत. बंद कालावधीत या घटकांना शासनाने कोणतेही साहाय्य केलेले नाही. भारतीय संविधानामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे स्वत:चे कुटुंब आणि कामगारांचे वेतन देण्यासाठी आता आमची दुकाने उघडण्याशिवाय काहीही पर्याय राहिलेला नाही.

सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (डावीकडून चौथे) यांना निवेदन देतांना व्यापारी महासंघाचे अतुल शहा (डावीकडून तिसरे), तसेच अन्य

त्यामुळे सर्व व्यावसायिक ८ जुलैपासून सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत त्यांची दुकाने चालू करणार आहेत याची नोंद घ्यावी, असे निवेदन व्यापारी महासंघाच्या वतीने सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना ७ जुलै या दिवशी देण्यात आले. या वेळी व्यापारी महासंघाचे अतुल शहा, विराज कोकणे, राजेंद्र पवार, तसेच सुभाष सारडा,अश्वीन दावडा, शामसुंदर परिख, अभय गोगटे, ओंकार शिखरे आणि अन्य उपस्थित होते.

सांगली महापालिका आयुक्त (डावीकडे) यांना निवेदन व्यापारी महासंघाचे अतुल शहा (उजवीकडे), तसेच अन्य