पुणे शहरात विविध ठिकाणी प्रशासनाकडून धडक कारवाई

वाळू तस्करांची धरपकड, तसेच वस्तू आणि सेवा करचुकवेगिरी करणार्‍यांना अटक

पुणे – प्रशासनाकडून वाळू तस्करांवर, तसेच वस्तू आणि सेवा कर विभागाकडून करचुकवेगिरी करणार्‍यांवर धडक कारवाई चालू आहे. याच अंतर्गत २३ जून या दिवशी तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी कोंढवा, येवलेवाडी परिसरात अनधिकृतपणे  २५ ते ३० ब्रास (१०० घनफूट) मातीमिश्रीत वाळू भरून नेणारे ७ ट्रक पकडून त्यांच्या चालकांना अटक करण्यात आली. वस्तू आणि सेवा कर विभागाकडून अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे आणि राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३० कोटींपेक्षा अधिक रकमेची खोटी देयके देणार्‍या व्यापार्‍याला अटक करण्यात आली.