भाजीपाला आणि फळ बाजार व्यापारी संघटनांकडून कोरोनानिर्मूलनासाठी आर्थिक साहाय्य !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश देतांना व्यापारी

नवी मुंबई – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला आणि फळ बाजारातील व्यापार्‍यांनी कोरोनाच्या निर्मूलनासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ६६ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने या निधीचे धनादेश सुपूर्द केले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजीपाला व्यापारी महासंघ आणि फ्रंट ऑफ युनायटेड फ्रुट असोसिएशन यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर पिंगळे आणि भाजीपाला बाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी सर्व व्यापार्‍यांना आवाहन केले होते. त्यानुसार फळ बाजारातील २३६ व्यापार्‍यांनी आणि धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुलातील शेकडो व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे धनादेश जमा केले. यामध्ये फळ व्यापार्‍यांनी ५५ लाख, तर भाजीपाला व्यापार्‍यांनी ११ लाखांचे धनादेश दिले आहेत.