कोच्ची – पिनराई विजयन् यांनी दुसर्यांदा केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या नूतन मंत्रीमंडळात माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. के.के. शैलजा यांनी आरोग्यमंत्री असतांना चांगली कामगिरी बजावली होती, तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केल्यामुळे त्याचा अल्प प्रमाणात फैलाव झाला होता. त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याची मागणी राज्यातील काही अभिनेत्री, तसेच समाजातील अनेक नामांकित व्यक्ती यांनी केली आहे.