स्वतःमध्ये पालट करण्याची तीव्र तळमळ असलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले हडपसर (पुणे) येथील कै. राजेंद्र पद्मन !

हडपसर (पुणे) येथील राजेंद्र पद्मन यांचे ५.४.२०२१ या दिवशी कोरोनामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६०वर्षे होते. ५.५.२०२१ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी श्रीमती भारती पद्मन यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कै. राजेंद्र पद्मन

१. कठीण परिस्थिती आनंदाने स्वीकारणे आणि सकारात्मकता

​‘पद्मन लहानपणापासूनच अतिशय समजूतदार होते. त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीसाठी तक्रार केली नाही. जे काही समोर येईल, ते त्यांनी मनापासून आणि आनंदाने स्वीकारले. अगदी लहानपणापासून पद्मन यांच्या जीवनात काही कठीण प्रसंग आले. अनेक वेळा त्यांना स्वतःच्या मनाला मुरड घालावी लागली; पण त्यांनी कधीही नकारात्मक विचार केलानाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये ते हसतमुख आणि सकारात्मक राहिले.

१ अ. नातेवाइकांनी विनामूल्य काम करवून घेतल्यावरही त्याविषयी नकारात्मकता न ठेवता ‘त्यातून पुष्कळ शिकायलामिळाले’, असा भाव असणे : पद्मन यांच्या तरुण वयामध्ये त्यांच्या नातेवाइकांनी त्यांच्याकडून जवळजवळ १२ वर्षे पुष्कळकामे विनामूल्य करून घेतली. एकदा शेतातील कामाची माहिती नसतांना नातेवाइकांनी त्यांना भर उन्हात शेतात काम करायला नेले. काम संपवून ते घरी आले, तेव्हा त्यांचे हात आणि पाठ यांवर फोड आले होते; पण त्यांनी त्याचा बाऊ केलानाही किंवा कधी नकारात्मक विचारही केला नाही. ‘त्यांच्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळाले’, असाच त्यांचा भाव होता. नातेवाइकांनी सांगितलेले काम ते भाव ठेवूनच करायचे. त्यामुळे ते नातेवाईक ‘राजू संत आहे’, असे म्हणायचे.

२. त्यांना मिळालेली कुठलीही सेवा ते फार तळमळीने, भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे.

३. सेवा करतांना झालेल्या चुका ते प्रांजळपणे पुढे सांगायचे आणि त्यासाठी क्षमायाचनाही करायचे.

४. सहनशील

मार्च २०२१ च्या शेवटी रुग्णाईत झाल्यानंतर ते ४ – ५ दिवस गावाकडे एकटेच होते. तेथून आल्यानंतर ते १६ दिवस रुग्णालयात भरती होते. अशा परिस्थितीत त्यांनी ‘मला त्रास होत आहे’, असे एकदाही आम्हाला सांगितले नाही. उलट तेचआमची प्रेमाने विचारपूस करायचे.

५. स्वतःला पालटण्याची तळमळ

​साधकांनी सांगितलेली चूक असो किंवा घरात मुलांनी सांगितलेल्या चुका असो, ते त्यांवर चिंतन करायचे आणि त्याचुकांसाठी संबंधितांकडे क्षमायाचना करायचे. ते तळमळीने स्वतःमध्ये पालट करण्यासाठी प्रयत्न करायचे. या ६ मासांतत्यांनी स्वतःमध्ये पुष्कळ पालट केले होते. ते सतत ‘मला कुठे कुठे पालटायचे आहे ?’, यावर चिंतन करायचे. ते स्वतःकडूनझालेल्या चुकांसाठी मुलाकडेही क्षमा मागायचे. ते सूनबाईंनाही स्वतःच्या चुका विचारायचे.

६. भाव

६ अ. श्री गुरूंनी ‘प्रत्येक साधकाचे घर रामनाथी आश्रम झाला पाहिजे’, असे यजमानांना सांगणे आणि तेव्हापासून घरआश्रमाप्रमाणे होण्यासाठी सतत भावपूर्ण प्रयत्न करणे : पूर्वी एकदा यजमानांना रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तेथे श्री गुरूंनी त्यांना ‘आपल्याला प्रत्येक ठिकाणी रामनाथी आश्रम करायचा आहे. प्रत्येक साधकाचे घर हे रामनाथी आश्रमव्हायला हवे’, असे सांगितले. श्री गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी घरी आल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ त्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. प्रत्येक क्षणी ते ‘हा माझ्या श्री गुरूंचा आश्रम आहे. माझे श्री गुरु येथे येणार आहेत’, या भावाने दिवस-रात्र घरातील प्रत्येक कृती सेवाभावाने करायचे. सकाळी साडेतीन-चार वाजता उठून ते नामजप आणि सेवा करायला आरंभकरायचे. त्यांना ‘थोडी विश्रांती घ्या’, असे सांगितल्यावर ते म्हणायचे, ‘‘वेळ फार अल्प राहिला आहे. आपल्याला लवकर गुरुदेवांच्या जवळ जायचे आहे.’’

६ आ. ‘गुरुदेवांनी आनंदी ठेवले आहे’, असा भाव असणे : कुठल्याही परिस्थितीमध्ये, अगदी स्वतःजवळ पैसे नसतांनाही तेआनंदी असायचे. ‘गुरुदेवांनी मला पुष्कळ काही दिले आहे. मला ऐश्वर्यात ठेवले आहे’, असा त्यांचा सदैव भाव असायचा.

७. प्रार्थना

​‘प.पू. गुरुदेव, मला पद्मन यांची गुणवैशिष्ट्ये तुमच्या कृपेनेच लिहिता आली, तुम्हीच ती लिहून घेतली. गुरुदेव, ‘त्यांच्याप्रमाणे माझ्यातही आपल्याप्रती उत्कट भाव, भक्ती आणि आपल्या चरणांच्या प्राप्तीची तळमळ निर्माण होऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– श्रीमती भारती पद्मन (पत्नी), हडपसर, पुणे. (२.५.२०२१)

आनंदी, प्रेमळ आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे कै. राजेंद्र पद्मन !

१. श्री. सौरभ पद्मन (मुलगा), हडपसर, पुणे.

१ अ. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे : ‘घरातील सर्वांनी प्रतिदिन नामजपादी उपाय वेळेत आणि परिपूर्ण करण्यासाठी बाबा तळमळीने प्रयत्न करायचे. त्यांनी मला साधनेतील उपायांचे महत्त्व पटवून दिले होते.

१ आ. इतरांचा विचार करणे : काही वर्षांपूर्वी बाबा उद्योजक असतांना कितीही आर्थिक अडचणी आल्या, तरी ते सर्वकर्मचार्‍यांना वेळेमध्ये मासिक वेतन द्यायचे.

१ इ. कर्मचार्‍यांना साधनेला लावणे : काही वर्षांपूर्वी त्यांनी कारखान्यामधील सर्व कर्मचार्‍यांना साधनेला लावले होते. ते त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन द्यायचे. आजही ते सर्व कर्मचारी साधक आहेत.

१ ई. साधनेचे गांभीर्य : वैयक्तिक जीवनामध्ये कुठेही किंवा कामानिमित्त नातलगांच्या घरी गेल्यावर बाबा कुठेही अनावश्यकवेळ वाया न घालवता नामजप, साधना आणि उपाय यांत वेळ व्यतीत करायचे. त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्ती नव्हती.

१ उ. आजही संपूर्ण गावामध्ये बाबांना देवमाणूस म्हणून ओळखले जाते.’

२. सौ. दीपाली पद्मन (सून), हडपसर, पुणे.

२ अ. आनंदी : ‘उत्पन्नाचे कुठलेही साधन नसतांना गुरुदेव माझ्या पाठीशी आहेत’, या भावाने बाबा (सासरे) नेहमी आनंदीअसायचे.

२ आ. प्रामाणिकपणा : व्यावहारिक जीवनामध्ये कुठलेही सरकारी किंवा निमसरकारी काम करतांना त्यांनी कधीही अयोग्यमार्गाचा अवलंब केला नाही. त्यांनी प्रत्येक काम १०० टक्के सरकारी नियमांना अनुसरून केले आणि आम्हालाही करायला शिकवले.

२ इ. प्रेमभाव : बाबा कुठलीही कृती करतांना ‘इतरांना त्रास होणार नाही’, याची नेहमी काळजी घ्यायचे. ते सर्वांची प्रेमभावाने विचारपूस करायचे.

२ ई. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्नरत असणे : ते स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचे प्रयत्न कठोरतेने करायचे. कुठल्याही प्रसंगांमध्ये ‘योग्य-अयोग्य काय आहे ?’, याचा विचार करून ते कृती करायचे.

२ उ. गुरुदेवांप्रती श्रद्धा : त्यांची देव आणि प.पू. गुरुमाऊली यांच्यावर फार श्रद्धा होती. कितीही वाईट प्रसंग आले, तरी त्यांचीश्रद्धा कधी डळमळीत झाली नाही.’

२ ऊ. गुरुदेवांप्रती असलेला भाव : प्रतिदिन ‘आपली गुरुमाऊली आपल्या घरी येणार आहे’, असा भाव ठेवून ते घराची स्वच्छता आणि शुद्धी करायचे.’ (२.५.२०२१)