प्रजा आणि अधिकारी यांच्यात कसलीही लबाडी नसावी. लाच खाणेच कुणाला ठाऊक नसावे. सर्व कामे आपुलकीने व्हावीत. एखाद्याच्या नेतृत्वाखाली होऊ पहाणार्या कोणत्या एका कामासाठी; म्हणून इतक्या अशा पैशांचा अंदाज झाला असला, तरी एक पैसाही व्यर्थ व्यय न करता, श्रमोचित वेतनाचा मात्र स्वीकार करावा. बाकीचा पैसा ‘राष्ट्राचा’ म्हणून तो परत करण्याचा प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेम प्रत्येकात असले पाहिजे. राष्ट्रातील कुणाचाही एक पैसाही अनाठायी व्यय होऊ नये किंवा तो अन्यायाने मिळवलेला असू नये. – प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, डिसेंबर १९९५)