परात्पर गुरु डॉ. आठवले यांंची मानसपूजा करतांना साधिकेला आलेली अनुभूती

श्रीमती जयश्री मुळे

१. विजयादशमीच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांंची मानसपूजा करतांना त्यांचे चरण आणि मस्तक यांच्यावर सोनचाफ्याची फुले वहाणे : ‘८.१०.२०१९ या विजयादशमीच्या दिवशी सकाळी मी नामजपाला बसण्यापूर्वी ९.१५ वाजता माझ्याकडून आपोआपच परात्पर गुरु डॉ. आठवले यांंची मानसपूजा चालू झाली. मी परात्पर गुरु डॉक्टरांना मानस नमस्कार केला. मी त्यांची केशरमिश्रित दुधाने पाद्यपूजा केली. मी त्यांच्या चरणांवर केशराचे स्वस्तिक काढले, तसेच त्यांच्या कपाळाला टिळा लावला. मी त्यांना आर्ततेने प्रार्थना करत असतांना गुरुदेवांचे चरण आणि मस्तक यांवर मी सोनचाफ्याची फुले वहात होते. मी त्यांच्या गळ्यात सोनचाफ्याचा फुलांचा हार घातला. मी गुरुदेवांना केशरी खोबर्‍याच्या वडीचा नैवेद्य दाखवला. तेव्हा सगळीकडे तेजस्वी पिवळे किरण चमकत होते. त्या वेळी माझे ध्यान लागले. मला परात्पर गुरुदेव सोनेरी रंगांचे दिसत होते.

२. सकाळी मला ही अनुभूती आली आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरुदेवांवर सुवर्ण बिल्वपत्रे वाहून अभिषेक केल्याचे संध्याकाळी मला समजले.

तेव्हा माझी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली. ‘माझी पात्रता नसतांनाही देवाने मला ही अनुभूती दिली’, त्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी अल्पच आहे.’

– श्रीमती जयश्री मुळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक