नागपूर – गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातील कोपारशीच्या जंगलात म्हणजेच महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेजवळ ५ किलोमीटर आत माड भागात नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोच्या नेतृत्वाखाली ४८ घंटे अभियान करून हा कारखाना उद्ध्वस्त केला. गडचिरोली पोलिसांची ही सर्वांत मोठी कामगिरी आहे. या अभियानात एक सैनिक घायाळ झाला आहे, अशी माहिती गडचिरोली येथील पोलीस उपमहानिर्देशक संदीप पाटील यांनी दिली.