मुंबई – २४ फेब्रुवारी या दिवशी मुंबईमध्ये कोरोनाचे १ सहस्र १६७ रुग्ण आढळले आहेत; मात्र त्यांतील ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिली.
विशेष म्हणजे मागील काही दिवस रुग्णांची संख्या न्यून होत असतांना २४ फेब्रुवारी या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुपटीपर्यंत वाढली. २३ फेबु्रवारी या दिवशी मुंबईत कोरोनाचे ६४३ नवीन रुग्ण सापडले होते.