भाग्यनगर (आंध्रप्रदेश) – राज्याचे मुख्यमंत्री वाय. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस्. शर्मिला रेड्डी यांनी तेलंगाणा राज्यामध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा संकेत दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा संकेत दिला. शर्मिला रेड्डी म्हणाल्या की, राजशेखर रेड्डी (शर्मिला यांचे दिवंगत वडील) यांची राजवट मी पुन्हा घेऊन येणार आहे. त्यांनी संयुक्त आंध्रसाठी स्वतःचा जीव दिला. तेलंगाणाचे लोक सध्या खुश नाहीत. त्यांना पालट हवा आहे.
New political party in #Telangana?
YS Sharmila, sister of #AndhraPradesh CM, YS Jagan Mohan Reddy held meeting today with loyalists of former AP CM Dr Y S Rajasekhara Reddy, in #Hyderabad
Has hinted of a new party in Telangana
Promises #RajannaRajyam https://t.co/Y3lWZfVnQk
— TNIE Telangana (@XpressHyderabad) February 9, 2021
शर्मिला यांनी जो राजकीय मार्ग निवडला आहे, त्याला भाऊ जगनमोहन रेड्डी आणि परिवारातील अन्य सदस्य यांची सहमती नाही, असे अप्रत्यक्ष संकेत जगनमोहन रेड्डी यांचे राजकीय सल्लागार आणि वाय.एस्.आर्. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जल रामकृष्णन् यांनी विजयवाडामध्ये दिले आहेत.