‘स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व’ याविषयी साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

​‘जुलै २०१७ मध्ये एकदा मी नृत्याचा सराव करत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने भावस्थिती अनुभवली. मी भावावस्थेत अधिक काळ राहिल्याने माझे मन शांत झाले होते. त्यानंतर सहसाधिकेसह झालेल्या काही प्रसंगांमधे माझ्यातील स्वभावदोष उफाळून मला राग आला. राग आल्यानंतर माझी भावस्थिती अल्प होत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी देवाने मला सूक्ष्मातून होत असलेली प्रक्रिया दाखवली, ‘माझ्या सभोवती असलेल्या निळ्या भावकणांचे रूपांतर प्रथम लालभडक कणांत आणि काही कालावधीने त्याचे रूपांतर काळ्या कणांत झाले.’

​वरील प्रक्रिया अनुभवल्यावर ‘भावजागृतीसह स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे किती अत्यावश्यक आहे !’, याची माझी जाणीव वाढली.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०१७)