भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – एकपत्नी आणि आचारसंपन्नतेचा आदर्श असलेल्या प्रभु श्रीराम यांनी वनवासातील १४ पैकी ११ वर्षे वास्तव्य केल्याने ‘चित्रकूट’ हे स्थान आणि नाम सर्वांसाठी पवित्र अन् पूजनीय झाले; परंतु स्वत:च्या वर्तणुकीतून प्रभु श्रीराम यांच्या नीतीमूल्यांची अवहेलना करणारे मंत्री धनंजय मुंडे चित्रकूट नावाला कलंकित करत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. धनंजय मुंडे यांना त्यांचा पक्ष आणि सरकार यांच्याकडून अभय मिळाल्याने त्यांच्या पदाचे त्यागपत्र घेण्यात आलेले नाही; पण किमान त्यांनी चित्रकूट बंगल्यात राहून या पवित्र नावाचा अवमान तरी करू नये. त्यामुळे एकतर त्यांच्याकडून चित्रकूट बंगला रिकामा करून घ्यावा किंवा या बंगल्याचे नाव पालटून ‘लंका’ असे तरी ठेवावे, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.