सर्वसामान्य भारतियांना भ्रष्टाचार पापकर्म न वाटणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !

‘काही दिवसांपूर्वी एका परिचिताशी भेट झाली. त्यांनी म्हटले, ‘‘माझ्या कन्येचा विवाह सुनिश्‍चित झाला आहे. मुलगा सरकारी चाकरीत आहे आणि खात्यापित्या घराण्यातील असून चांगल्या संस्कारांचा आहे. त्या मुलाची सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की, त्याची वरकमाईही (लाच घेऊन धन कमावणे) आहे.’’ मी म्हणाले, ‘‘पण वरकमाई करणे, तर पाप आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘आजकाल तर सर्वजण तेच करतात. वरकमाई करणे, हे काही आता पापकर्म राहिले नाही.’’ यातूनच लक्षात येते की, सर्वसामान्य भारतियांना भ्रष्टाचार करणे आता पापकर्म वाटत नाही, तर वरकमाई करणार्‍या व्यक्तीला आता सुसंस्कारी म्हटले जाते. ज्या देशात सर्वसामान्य व्यक्तीची मानसिकता अशी झाली असेल, तर त्या देशाचे नाव भ्रष्टाचारी देशांच्या सूचीत (अग्रक्रमावर) आले, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?’

(संदर्भ : मासिक ‘वैदिक उपासना’, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७)