नियतकालिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे. असे असतांनाही काही जिल्हे आणि राज्ये यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नाही. त्यामुळे वाचकांना त्यातील अमूल्य ज्ञानापासून वंचित रहावे लागते. सर्व नियतकालिकांचे आवृत्तीनुसार शेष नूतनीकरण पुढे दिले आहे.
१. सर्व नियतकालिकांचे शेष नूतनीकरण

पुणे, नाशिक, नागपूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे एप्रिल मासापर्यंतचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. छ. संभाजीनगर, रायगड, सोलापूर, बेळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचे एप्रिलपर्यंतचे नूतनीकरण अत्यल्प संख्येत राहिले आहे. गोवा राज्य, तसेच मुंबई, ठाणे, जळगाव, यवतमाळ, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचे जुलै मासापर्यंतचे नूतनीकरण अधिक संख्येत शेष असल्याने त्यांनी त्यासाठी तळमळीने प्रयत्न करावेत.
२. साधकांनी ३०.६.२०२६ या दिवसापर्यंत सर्व शेष नूतनीकरण प्राधान्याने पूर्ण करावे !
सर्वच जिल्ह्यांतील साधकांनी ‘नूतनीकरण मोहिमे’ला प्रथम प्राधान्य देऊन शेष नूतनीकरण वर दिलेल्या कालावधीतच पूर्ण करावे. प्रत्यक्ष नूतनीकरण करतांना ते काही मास अगोदरचे न करता वाचकाच्या अंकाची वर्गणी जेव्हा संपते, त्यानंतरच्या पुढील अंकापासूनच होईल, याची दक्षता घ्यावी. नूतनीकरणाची सेवा परिपूर्ण करून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपा संपादन करता यावी, यासाठी नूतनीकरणाच्या अंतर्गत येणार्या सर्व सेवा त्रुटींविरहित आणि भावपूर्ण कराव्यात.
भारत भरातील १,९८० वाचकांचे एप्रिल मासापर्यंतचे, तर ८,११५ वाचकांचे मे, जून आणि जुलै मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण १०,०९५ वाचकांचे जुलैपर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.
(६.६.२०२६)

साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : विस्थापित हिंदु साहाय्य