
१. अन्य कोणत्याही वर्तमानपत्रात सकारात्मक ऊर्जा नसून ती केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आहे !
श्री. सूरज हरवळकर, बेळगाव : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या साधकांच्या अनुभूती वाचून माझी भावजागृती होते, तशी अन्य दैनिके वाचून होत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या यंत्राद्वारे सकारात्मक ऊर्जा मोजली आहे. केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सकारात्मक ऊर्जा आहे.
२. हिंदूंच्या भयावह स्थितीविषयी वाईट वाटण्यापेक्षा राग येऊन हिंदूंची स्थिती बदलण्यासाठी ‘आपण काहीतरी करूया’, असे वाटायला हवे !
श्री. सूरज हरवळकर : सध्या भारतात सर्वत्र हिंदु समाजावर आक्रमणे आणि अत्याचार होत आहेत. काही ठिकाणी दंगे होऊन हिंदू पलायन करत आहेत. जेव्हा मी हे वाचतो, तेव्हा मला हिंदूंच्या भयावह स्थितीविषयी फार वाईट वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हिंदूंच्या भयावह स्थितीविषयी वाईट वाटण्यापेक्षा राग आला पाहिजे. ‘वाईट वाटले आणि रडत बसलो’, असे नको. ‘आता आपण हिंदूंची स्थिती बदलण्यासाठी काहीतरी करूया’, असे वाटले पाहिजे.
३. साधनेमध्ये भाव महत्त्वाचा !
श्री. सूरज हरवळकर : हो. मला काहीतरी करावेसे वाटते. गुरुदेव, ‘आपण प्रभु श्रीराम आहातच आणि आम्ही वानरसेना आहोत’, असे मला वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हा भाव महत्त्वाचा असतो. भाव असला की, देव आपल्या पाठीशी असतो. छान !’
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !