‘मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील फाटक कुटुंबीय (कै. अनिल फाटक आणि त्यांचा मुलगा श्री. अनिकेत फाटक) सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यांची मालवण येथे आंब्यांची मोठी बाग आहे. मागील १७ वर्षांपासून ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधक यांच्यासाठी आंबे पाठवतात.

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने झाडाला आंबे आले आहेत’, या भावाने प्रथम आलेले आंबे गुरूंना अर्पण करणे
फाटक कुटुंबीय गुरूंवरील श्रद्धेमुळे अनेक वर्षांपासून स्वतःच्या बागेत पहिले आलेले आंबे सनातनच्या आश्रमाला अर्पण करतात. त्या काळात आंब्यांना मूल्य अधिक असते, तरीही प्रथम आलेले आंबे गुरूंना अर्पण करण्याचा त्यांचा भाव असल्यामुळे ते नियमित अर्पण करतात. त्यांचा असा भाव असतो की, गुरूंच्या कृपेने झाडाला आंबे आले आहेत. त्यामुळे प्रथम आलेले आंबे गुरूंना अर्पण करून ते कृतज्ञता व्यक्त करतात. वडिलांच्या, म्हणजे कै. अनिल फाटक यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. अनिकेत यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे.

२. आंबे न लागणारे झाड सनातन संस्थेला अर्पण केल्यावर त्या झाडाला आंबे लागणे
श्री. फाटक यांच्या बागेत तोतापुरी आंब्याचे झाड लावले आहे. ते झाड लावल्यापासून त्याला आंबे आले नव्हते. त्यामुळे अनिल फाटक यांनी त्या झाडाला रागाने सांगितले, ‘तुला आंबे लागत नाहीत, तर मी तुला सनातन संस्थेला अर्पण करतो.’ त्यानंतर त्या झाडाला प्रत्येक वर्षी आंबे लागत आहेत. अनिल फाटक त्या झाडाचे आंबे रामनाथी आश्रमात अर्पण करतात.
२ अ. वरील आंब्याच्या झाडाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
१. वर्ष २०२६ मध्ये सर्व ठिकाणी आंब्याला चांगला मोहर आला होता. एवढा चांगला मोहर मी यापूर्वी पाहिला नव्हता; परंतु वाईट शक्तींची आक्रमणे, निसर्गाचा कोप, अवेळी पडलेला पाऊस आणि थंडी यांमुळे सर्व मोहर गळून पडला. सनातनला अर्पण केलेल्या तोतापुरी आंब्याच्या झाडाचा मोहर गळून पडला नाही. आता त्याला बरेच आंबे आले आहेत.

२. या वर्षी आम्ही या तोतापुरी झाडाला लागलेल्या आंब्यांच्या संदर्भात सेवा करण्यासाठी मालवण येथे गेलो होतो. त्या वेळी श्री. अनिकेत फाटक यांनी आम्हाला आंब्यांची बाग बघायला बोलावले होते. तेव्हा मी (सुश्री कल्याणी) तोतापुरी आंब्याच्या झाडाकडे जात असतांना माझा ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप चालू झाला.
३. ‘ते झाड म्हणजे मागील जन्मीचे ऋषिमुनी आहेत’, असे मला (सुश्री कल्याणी यांना) जाणवले.
४. ‘त्या झाडाच्या पानांचा रंग इतर झाडांच्या तुलनेत पोपटी असून चकाकत आहे’, असे मला (सुश्री कल्याणी यांना) जाणवले.’
– सुश्री कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४६ वर्षे) आणि श्रीमती क्षमा राणे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२४)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !