‘एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सर्पदंश उपचाराच्या संदर्भात विचारले. त्या वेळी त्यांच्याशी झालेले संभाषण पुढे दिले आहे.

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : एक व्यक्ती आहे. तिच्याकडे सर्पदंशापासून प्राण वाचवण्याचे मंत्रोपचार आहेत. ही मंत्रविद्या आपणही शिकून घ्यायची का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : एक वैशिष्ट्यपूर्ण मंत्रोपचार पद्धत म्हणून आपण तिचा अभ्यास करू शकतो. त्यातून आपल्याकडे येणार्यांना मंत्रशास्त्राचे महत्त्व कळेल; पण स्वतः साधना केल्यास साधकाला या उपचार पद्धतीच्याही पुढे जाता येते. साधनेने साधकातील सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे साधकावर जे आध्यात्मिक उपाय आणि उपचार होतात, त्यांचा जलद अन् सकारात्मक परिणाम होतो. संतांचा दिव्य स्पर्श आणि संकल्प यांमुळेही आध्यात्मिक त्रास दूर होऊ शकतात. पुढे साधकाची साधना वाढून त्याचे आध्यात्मिक बळ वाढते. साधनेमुळे निर्माण झालेल्या दैवी ऊर्जेनेच साधकावर उपायही होतात; पण जेव्हा वैद्यकीय उपचार सहजतेने उपलब्ध असतात, तेव्हा मात्र आपल्यातील साधनेचे बळ व्यय करू नये. देवाच्या कृपेने मिळालेल्या वैद्यकीय सुविधांचा लाभ अवश्य करून घ्यावा.
अशा किती व्याधींवर आपण मंत्र शिकणार आहोत ? त्यापेक्षा देवाचे एकच नाम हृदयात दृढ करावे. नामावरील श्रद्धाच पुढे आपत्काळात साधकांना संकटातून मुक्त करील. हे सर्व अनंताचे ज्ञान असल्याने कितीही उपचारपद्धती शिकल्या, तरीही त्या न्यूनच असणार आहेत. त्यापेक्षा एकाच नामावर श्रद्धा ठेवली, तर आपोआपच सर्व प्रश्न सुटतील आणि वेगवेगळे मंत्र शिकण्यात आपला वेळही जाणार नाही !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
उपचार आणि आध्यात्मिक उपाय![]() १. उपचार करणे व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक कारणांमुळे झालेल्या व्याधींवर वैद्यकीय औषधे देणे, याला ‘उपचार करणे’, असे म्हणतात; म्हणून ‘वैद्यकीय उपचार’, ‘औषधोपचार’ हे शब्द रूढ आहेत. २. आध्यात्मिक उपाय करणे नामजपादी उपायांद्वारे एखाद्या व्यक्तीने तिचा स्वतःचा किंवा दुसर्याचा शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रास दूर करणे, याला ‘आध्यात्मिक उपाय करणे’, असे म्हणतात. याला अपवाद ‘मंत्रोपचार’(मंत्र+उपचार) हा शब्द आहे. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.(२२.२.२०२६) |

यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !