‘वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोलण्यात अडथळे निर्माण करण्याचे कारण           

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रश्न –

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : वाईट शक्ती मला ठार मारण्याऐवजी माझे बोलणे बंद करून कार्यात अडथळे आणत आहेत. त्या असे का करत आहेत ? असे करण्याऐवजी त्या मला ठार का करत नाहीत ?

श्री. राम होनप

उत्तर –

श्री. राम होनप :  

१. वाईट शक्तींचे आसुरी कार्य

‘वाईट शक्ती ‘साधना करणार्‍या साधकांना त्रास देणे आणि त्यांच्या धर्मकार्यात अडथळे आणणे’, यांसाठी सूक्ष्मातून लक्षावधी वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे धर्मकार्य

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी पृथ्वीवर सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्याचे कार्य हाती घेतले. यासाठी त्यांनी सहस्रो जिवांमध्ये राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत केले, तसेच त्या जिवांच्या मनावर साधना अन् धर्माचरण यांचे महत्त्व बिंबवले. त्यामुळे त्या जिवांमधील सत्त्वगुण हळूहळू वाढू लागला.

३. वर्ष २००१ पासून वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर जीवघेणी आक्रमणे करण्यास प्रारंभ करणे

त्यामुळे वाईट शक्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर पुष्कळ चिडल्या. त्याचा परिणाम म्हणून वर्ष २००१ पासून वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर सूक्ष्मातून जीवघेणी आक्रमणे करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘प्राणशक्ती अल्प होणे, पुष्कळ थकवा येणे, तोंडाला कोरड पडणे’, इत्यादी त्रास होऊ लागले. पहिल्या आणि दुसर्‍या पाताळांतील वाईट शक्तींना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ठार करणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांच्या साहाय्याला अनुक्रमे पाताळ क्रमांक ३ ते ७ पर्यंतच्या वाईट शक्ती टप्प्याटप्प्याने आल्या.

४. वर्ष २०२२ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे बोलणे बंद करण्यासाठी वाईट शक्तींनी सूक्ष्मातून त्यांच्या मुखावर आक्रमण करणे

वर्ष २०२२ मध्ये सप्तपाताळांतील वाईट शक्तींच्या लक्षात आले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ठार करणे अशक्य आहे.’ त्यामुळे त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मुखावर सूक्ष्मातून आक्रमण करणे चालू केले. परिणामी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर बोलत असतांना त्यांच्या शब्दांचे उच्चार अस्पष्ट होऊ लागले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे बोलणे बंद झाल्यास ‘समष्टीला मार्गदर्शन मिळणार नाही आणि सनातन धर्माच्या कार्याला खीळ बसेल’, या उद्देशाने वाईट शक्तींनी त्यांचे बोलणे बंद पाडण्यावर लक्ष केंद्रित केले.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०२५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.