सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा आरोप

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा आहे. हा महामार्ग थेट गोवा राज्याला जोडतांना त्याचा एक उपमार्ग (फाटा) रेडी बंदराला जोडला जावा, अशी माझी मागणी आहे. या मागणीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
याविषयी केसरकर पुढे म्हणाले, ‘‘शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यानुसार या महामार्गावरून येणारे पर्यटक थेट गोवा राज्यात जाणार असतील, तर हा कोकणवर अन्याय आहे. कोकणात उत्कृष्ट असे समुद्रकिनारे आहेत, बंदरे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील माल गोव्याच्या बंदावरून आयात-निर्यात का व्हावा ?, हा प्रश्न आहे. हा मार्ग आजर्यावरून रेडी बंदराला जोडला गेला पाहिजे. हा रस्ता मुंबई-गोवा महामार्गाला छेदत (क्रॉस होत) असल्याने लोक पत्रादेवीला जाऊ शकतात, तसेच कोकणचा सागरी महामार्ग इथे जोडला जाणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून होणारा शक्तीपीठ महामार्ग केवळ चंदगडवरून गोव्याला जोडला जाऊ नये. चंदगडला दुर्लक्षित करावे, असे आपले म्हणणे नसून तिलारीमार्गे उत्तर गोव्याला अन् एक फाटा दक्षिण गोव्याला जोडला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणात पर्यटक चंदगड अन् दोडामार्ग तालुक्यांत वाढतील.’’
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन