
छत्रपती संभाजीनगर, ६ एप्रिल (वार्ता.) – सद्य:स्थितीत महिला आणि युवती यांच्या संदर्भात त्यांची छेडछाड करणे, मुलींना त्रास देणे अशा घटना वाढत आहेत. यासाठी युवती आणि महिला यांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वतः सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता आहे. स्वतःचे रक्षण कसे करावे ?, हे शिकलो, तरच आजची प्रत्येक हिंदु युवती सुरक्षितपणे अशा प्रसंगातून बाहेर पडू शकते आणि लढू शकते. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नायगव्हाण या गावामध्ये एक दिवसांचे ‘रडायचे नाही, लढायचे’ या ‘युवती शौर्यजागृती शिबिरा’चे नियोजन करण्यात आले होते.
या शिबिराचा अनेक हिंदु युवतींनी लाभ घेतला. या शिबिराचा उद्देश, तसेच महिला आणि मुली यांची सद्य:स्थिती अन् त्यावर उपाययोजना याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कु. श्रुती शिरसाठ यांनी विषय मांडला, तसेच कराटे आणि लाठी प्रशिक्षण श्री. गणेश बागडे यांनी दिले. शिबिराच्या शेवटी सर्व युवतींनी ‘या शिबिरामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. आतापर्यंत आमच्यात लढण्याचा किंवा प्रतिकार करण्याचा आत्मविश्वास नव्हता; पण या शिबिरातून आम्हाला ते शिकायला मिळाले आणि आमच्या मनाची सिद्धता झाली,’ असे मनोगत व्यक्त केले.
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !
Corporate Jihad : धर्मांतरास नकार दिल्याने ‘Wipro’च्या हिंदु महिलेला नोकरीवरून काढले !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
म्हार्दाेळ, गोवा येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद : गोव्यातील मंदिर प्रतिनिधींचा कृतीशील होण्याचा निश्चय !
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !