सहस्रो भाविकांची उपस्थिती

तुळजापूर – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापूर नगरी भक्तीमय झाली होती. अभिषेक पूजनानंतर रात्री उशिरा संबळच्या गजरात मातेचा पारंपरिक छबिना उत्साहात काढण्यात आला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथून आलेल्या सहस्रो भाविकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ या जयघोषात सहभागी होत वातावरण भक्तीमय केले.

मातेची चांदीची मूर्ती आकर्षक छबिना वाहनावर विराजमान करून रात्री पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणूक संपल्यानंतर महंत वाकोजी बुवा यांनी पारंपरिक पद्धतीने जोगवा मागितला. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीच्या वेळी भाविकांनी फुलांची उधळण करत आणि भक्तीगीते गायली. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. श्री भवानीदेवीची चांदीची मूर्ती छबिना वाहनावर विराजमान करून मिरवणूक काढण्यात आली
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान